India vs England T20 World Cup 2022: भारतीय संघाने दणक्यात सेमिफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. भारत आणि इंग्लंडमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंडचा (INDvsENG) धुव्वा उडवण्यास सज्ज झाल्याचं दिसतंय. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल. अशातच आता सामन्याआधी मोठी माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan) जखमी असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे तो सेमीफायनलच्या (India vs England) प्लेइिंग 11 मध्ये नसेल, अशी शक्यता क्रिडातज्ज्ञांनी वर्तविली होती. त्यानंतर आता इंग्लंडच्या संघात एका धाकड खेळाडूची एन्ट्री झाली आहे.


डेव्हिड मलानच्या जागी इंग्लंडच्या संघात फिल सॉफ्टला (Phil Salt) संधी देण्यात आली आहे. फिल सॉफ्ट हा आक्रमक सलामीवीर आहे. अनेकदा सुरूवातीच्या ओव्हरमध्ये तोडफोड करण्याची भूमिका त्यानं पार पाडली आहे. डेव्हिड मिलन (Dawid Malan) मागील मॅचमध्ये फिल्डिंग करताना जखमी झाला होता. त्यानंतर तो खेळणार की नाही?, याबाबत अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर त्याने (T20 World Cup 2022) बाहेरचा रस्ता पकडला आहे.


आणखी वाचा- IND vs ENG T20 : टीम इंडियाचे 'तीन हुकमी एक्के' सेमीफायनलमध्ये उद्ध्वस्त करणार इंग्लंडची राजवट!


दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी फिल सॉफ्टची संघात एन्ट्री करण्यात आली आहे. आत्तापर्यंत फिल सॉफ्टने 11 सामने खेळलेले आहेत. त्यात त्याने 164 च्या स्टाईक रेटने 235 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याचे 2 अर्धशतकीय खेळींचा देखील समावेश आहे.