मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 5 सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1नं भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला. आता पुन्हा टी 20 मालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले असले तरीदेखील भारतीय फलंदाजांची टीम इंग्लंडवर भारी पडू शकते असा विश्वास आहे. त्यामुळे डाव्या हाताने फलंदाजी करणारे इंग्लंडला धूळ चारणार असल्याचा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे. 


ऋषभ पंत, अक्षर पटेल,  रोहिल शर्मा,  वॉशिंग्टन सुंदर यांची भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी राहिली आहे. त्यांनी इंग्लंडला अक्षरश: जेरीस आणलं होतं. त्यामुळे इंग्लंडला तंबूत धाडण्यासाठी चार खेळाडू सज्ज आहेत. शिखर धवन आणि इशान किशन डाव्या हाताने खेळणारे खेळाडू आहेत. शिखर जरी पहिला सामना खेळणार नसला तरी उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळल्यानं इंग्लंड संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. 


टी नटराजन जखमी झाल्यामुळे पहिला सामना खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. तर दुसरीकडे 7 पद्धतीनं बॉलिंग करणारा वरून चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे त्यालाही संघातून बाहेर जावं लागलं. शिखर धवनला पहिल्या सामन्यासाठी संधी देण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. अक्षर पटेल आणि चहरला संघात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टी 20 मालिका पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता स्टेडियममध्ये खूप मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. तर कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं प्रेक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे. 500-10 हजार रुपयांपर्यंत त्याचं टिकीट असणार आहे. 


टी 20 मालिकेचं शेड्युल आणि संभाव्य टीम कशी असेल?
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया आणि वॉशिंग्टन सुंदर
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20 सामना- 12 मार्च
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20 सामना- 14 मार्च
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20 सामना- 16 मार्च
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20 सामना- 18 मार्च
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना- 20 मार्च