IND vs ENG T20 : टीम इंडियाचे `तीन हुकमी एक्के` सेमीफायनलमध्ये उद्ध्वस्त करणार इंग्लंडची राजवट!
Semi Final T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियातील अॅडिलेटच्या (Adelaide) मैदानात IND vs ENG हा सामना खेळला जाईल. तिथं रोहितचे तीन घातक खेळाडू वर्ल्ड कप जिंकवण्याचं स्वप्न पुर्ण करतील.
IND vs ENG, Semi Final T20 World Cup 2022 : सध्या ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात असलेला टी-ट्वेंटी वर्ल्ड आणखी रंगदार स्थितीत पोहोचला आहे. वर्ल्ड कपमधील आता सेमीफायनल (semi final T20 World Cup match schedule) सामन्यांना सुरूवात झाली असून टीम इंडिया फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG T20) यांच्यात गुरूवारी सेमीफायनलचा सामना जाईल. मात्र, त्याआधी कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) आपल्या संघातील तीन तलवारींना धार करून ठेवली आहे.
ऑस्ट्रेलियातील अॅडिलेटच्या (Adelaide) मैदानात हा सामना खेळला जाईल. त्याआधी रोहित शर्मा अँड टीम मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता रोहितचे तीन घातक खेळाडू वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकवण्याचं स्वप्न पुर्ण करतील. (Semi-final fixtures confirmed for T20 World Cup 2022)
पहिला एक्का विराट कोहली (Virat Kohli) -
पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचं (IND vs PAK) नाक ठेचणारा विराट कोहली रोहित शर्माचा खास प्लेयर आहे. विराट मागील वर्षी फॉर्ममध्ये येण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर आता विराटने मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक मॅचमध्ये धडाकेबाज कामगिरी करत विराटने प्रत्येक संघाचा धुव्वा उडवला आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या चालू सिझनमध्ये विराटने 246 धावा चोपल्या आहेत.
दुसरा एक्का सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) -
सगल तीन अर्धशतक ठोकणारा सुर्यकुमार म्हणजे रोहितची जादूची कांडी. जेव्हा टीम इंडियाला गरज असेल त्यावेळी मैदानात उतरून तोडफोड करणारा फलंदाज म्हणजे सुर्या... आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सुर्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे सेमीफायनलपुर्वी रोहित शर्माने सुटकेचा घेतलाय.
आणखी वाचा - T20 World Cup 2022 : भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला...
तिसरा एक्का अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) -
बुमराह टीममध्ये नसल्याने सर्वांच्या चिंता वाढवल्या होत्या. मात्र, त्या तोडीचा गोलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे. लेफ्ट हॅडर फास्ट बॉलर अर्शदीप सिंगने 5 सामन्यात 10 विकेट घेत मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. 23 वर्षाचा अर्शदीप संघातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) गोळीगत बॉलिंगची मदत देखील मिळताना दिसत आहे.