Ind vs Eng Semi Final : भारत आणि इंग्लंडमध्ये (ind v eng 2022) चालू असलेल्या सेमी फायनलच्य सामन्यामध्ये भारताने इंग्लंड संघाला 169 धावांचं लक्ष्य दिलं आहे. भारताकडून हार्दिक पंड्याने वादळी अर्धशतकी खेळी केली. पंड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 150 धावांचा टप्पा पार केला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारताने पंडया आऊट कसा? हा प्रश्न सर्वांना पडला असावा. (What exactly happened Pandyas boundary on the last ball, how is he still out?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?
भारत 150 धावा तर करतो की नाही अशी परिस्थिती झाली होती मात्र पंड्याने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी भारतासाठी फायद्याची ठरली. हार्दिकने शेवटच्या षटकामध्ये ख्रिस जॉर्डनला सलग दोन षटकार मारले त्यानंतर शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला मात्र त्यावेळी पंड्याचा पाय हा स्टम्सला लागला, पंड्या हिट विकेट झाला आणि भारताला तो चौकार मिळाल नाही. 


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


भारताकडून सलामीवीर के. एल. राहुल. 7 धावा  करून स्वस्तात परतला. कर्णधार रोहित शर्मा 23 धावा करून बाद झाला. सुर्यकुमार यादवने चौकार आणि सिक्स मारत आक्रमक सुरूवात केली होती मात्र तोसुद्धा 14 धावांवर माघारी परतला. सामन्याची धुरा हार्दिक पंड्याने आणि विराटने हाती घेत संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. पंड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या. इंग्लंडसमोर हे आव्हान तोकडं वाटत आहे. 


दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडीया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद