मुंबई: श्रीलंका दौऱ्यावर एकीकडे टीम इंडियाची कामगिरी उत्तम सुरू आहे. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या सीनियर टीममधून एक मोठी अपडेट येत आहे. टीम इंडियाचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. इंग्लंड सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलला दुखापत झाल्यानं तो सीरिजबाहेर असणार आहे. आता सरावा दरम्यान आणखी तीन खेळाडू जखमी झाले आहेत .इंग्लंड दौर्‍यावर सरावादरम्यान टीम इंडियाचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज अवेश खान सराव करताना जखमी झाले.
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या पाठीला त्रास होत आहे. तर राहणेच्या डाव्या पायाला सूज आली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी हे दोघेही काउंटी सेलेक्ट इलेवन विरुद्ध खेळू शकले नाहीत. त्याचवेळी काउंटी सिलेक्ट इलेव्हनकडून भारत विरुद्ध खेळत असताना अवेश खानला दुखापत झाली.




आवेश खानच्या बोटाला दुखापत झाल्यानं त्याला बॉलिंग करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. दुसरीकडे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे सामन्यात येऊ शकले नाहीत.


बीसीसीआयने तिघांच्या दुखापतीसंदर्भात माहिती दिली आहे. सोमवारी रात्री विराटला पाठीचा त्रास जाणवू लागला. तर मेडिकल टीमने विराटला तीन दिवस सराव न करण्याचा सल्ला दिला आहे. राहणेच्या पायाला सूज आल्यानं त्याला इंजेक्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे तो सराव सामन्यात खेळू शकला नाही. 


चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडियाला इंग्लंड सीरिजमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. मात्र सातत्याने विघ्न येत आहेत. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.