मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. इंग्लंडविरूद्ध सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या आऊट ऑफ फॉर्मची मालिका संपण्याचे नाव घेत नाही आहे. या त्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंकडून त्याला लक्ष केले जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव (Kapil Dev) यांनी या आधी विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता टीम इंडियाचा माजी स्टार वेंकटेश प्रसादने (venkatesh prasad)  याने तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर ट्विटरवर विराट कोहलीचे नाव न घेता टीका केली.


वेंकटेश प्रसादने (venkatesh prasad) सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा तुम्ही आऊट ऑफ फॉर्म असायचात, तेव्हा तुम्हाला संघातून ड्रॉप केलं जायचं. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात हे पाहिलं नाही जायचं. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग या खेळाडूंनाही फॉर्ममध्ये नसताना संघातून वगळलं होतं. या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळले, धावा केल्या आणि त्यानंतर टीम इंडियात आले, असे त्यांनी सांगितले.  


'अनिल कुंबळेलाही बाहेर बसवलं होतं'
वेंकटेश प्रसाद (venkatesh prasad) पुढे म्हणाला की, आता परिस्थिती बदललेली दिसतेय. आता तुम्ही आऊट ऑफ फॉर्म असल्यावर तुम्हाला विश्रांती दिली जाते. हा पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही,असे म्हणत त्यांनी टीम इंडियाच्या पॉलिसीवर टीका केली.  


देशात खूप टॅलेंट आहे, तुम्ही फक्त नावाने खेळू शकत नाही. भारताच्या सर्वोत्तम मॅचविनरपैकी एक अनिल कुंबळेलाही अनेकदा बाहेर बसावे लागले, असे उदाहरण देत त्यांनी विराटवर निशाणा साधला.  


दरम्यान विराट कोहलीचा आऊट ऑफ फॉर्म भारतासाठी धोक्याची घंटा आहे. आगामी टी-20 विश्वचषक पाहता त्यांनी फॉर्ममध्ये यावं अशी अपेक्षा क्रिकेट चाहते करतायत.