IND vs ENG: Rohit Sharma बरोबर कोण करणार ओपनिंग? या प्लेअर्सनी वाढवले Virat चे टेन्शन
रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर 5 फलंदाज (Batsman) मॅच ओपनींगसाठी दावेदार आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेन्ट समोर एक अडचण उभी राहिली आहे. ती म्हणजे रोहित शर्मा बरोबर मॅच ओपनींग (opening) कोण करणार?
मुंबई : टीम इंडियाने इंग्लंडला 5 मॅचच्या टी20 सीरीजमधल्या शेवटच्या सामन्यात 36 धावांनी मात दिली. टीम इंडियाने ही टी-20 सीरीज 3-2 ने जिंकली आहे. आता टीम इंडिया 23 मार्चपासून इंग्लंड सोबत वन डे सामना (One day series) खेळायला सज्ज झाली आहे. या सीरीजच्या आधीच टीम इंडियाच्या खेळाडूची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर 5 फलंदाज (Batsman) मॅच ओपनींगसाठी दावेदार आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेन्ट समोर एक अडचण उभी राहिली आहे. ती म्हणजे रोहित शर्मा बरोबर मॅच ओपनींग (opening) कोण करणार?
शिखर धवन की के एल राहुल?
भारताकडून ओपनिंगसाठी एक खेळाडू रोहित शर्मा तर नक्की आहे. अशा परिस्थितीत रोहितला साथ देण्यासाठी कोण मैदानात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या संघात शिखर धवन खेळणार आहे, शिखर धवन या आधी रोहितबरोबर ओपनिंग फलंदाज (Batsman) म्हणून भारतीय टीमसाठी खेळला आहे. पण धवनचा अलीकडील खेळ फारसा चांगला नव्हता.
के एल राहुल देखील एक पर्याय आहे, परंतु इंग्लंडविरुद्धच्या टी -20 सारीजमध्ये तो फ्लॉप ठरला. विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून राहुलला संघात स्थान देण्यात आले होते, पण आता चांगल्या फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंतही टीममध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मिडल ऑर्डरमधेही राहुलला स्थान मिळणे कठीण आहे.
टीममध्ये शुभमन गिलचे ही नाव
भारतासाठी टेस्ट मॅचमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे शुभमन गिल (Shubhman Gill)ला इंग्लंड विरोधात वनडे सीरीजमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. शुभमन हा शानदार युवा खेळाडू आहे आणि येत्या काही काळात टीम इंडियाचा स्टार खेळाडू बनु शकतो. अशात टीमकडून तो मॅच ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे. परंतू त्याने आता पर्यंत 3 वनडे मॅचमध्ये 49 रन बनवले आहे.
टेस्टनंतर भारताने जिंकली टी-20 सीरीज
भारताने इंग्लंडला सलग दुसऱ्या सीरीजमध्ये मात दिली आहे. भारताने पहिल्या टेस्ट सीरीजमध्ये इंग्लंडला 3-1 ने मात दिली. तर T-20 सीरीजमध्ये इंग्लंडला 3-2 असे हरवले. भारताने सलग सहावी टी-20 सीरीज जिंकली आहे. आता 23 मार्चपासून भारत वनडे सीरीजमध्ये इंग्लंड सोबत खेळेल.
आता रोहीत सोबत ओपनींग फलंदाज म्हणून कोणत्या खेळाडूची वर्णी लागते हे आपल्याला 23 तारखेलाच मॅचमध्येच कळेल.