IND vs IRE : आयपीएलमुळं (IPL) अनेक खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं. काहींनी या संधीचं सोनं केलं आणि तिथूनच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवं वळण मिळालं. याच आयपीएलमधून प्रकाशझोतात आलेलं एक नाव म्हणजे, रिंकू सिंह. लीग गाजवणाऱ्या रिंकूला भारतीय संघात स्थान मिळालं असून, त्यानं आता आयर्लंडही गाठलं. क्रिकेट जाणकारांच्या मते आयर्लंडविरोधातील पहिल्याच टी20 सामन्यामध्ये रिंकू संघातून पदार्पण करु शकतो. त्याच्यासाठी हा दौरा अतिशय खास ठरणार आहे, कारण या दौऱ्याच्या निमित्तानं तो काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत आहे. मग ते परदेशी भूमीवर खेळणं असो किंवा बिझनेस क्लासनं विमान प्रवास करणं असो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रिंकू कसा खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेलच पण, त्याआधी त्याच्या मनातली भीती त्यानं थेट बीसीसीआयसमोरच बोलून दाखवली. काय आहे बरं ही भीती? (IND vs IRE rinku singh and jitesh sharmas fun coverstion on flight watch video )


विमानप्रवासादरम्यानच रिंकूनं याबद्दलची कल्पना त्याचा सहप्रवासी आणि संघातील खेळाडू जितेश शर्मा याच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. BCCI नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये जितेश आणि रिंकू एकमेकांशी संवाद साधताना दिसत आगेत. प्रवास कसा वाटतोय इथपासून जितेशच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं रिंकूनं दिली. त्याच्या या बोलण्यात प्रचंड साधेपणा आणि आपण काहीतरीह पहिल्यांदाच अनुभवतोय यासाठीचं कुतूहलही पाहायला मिळालं. 


हेसुद्धा वाचा : महिन्याभराचा पगार खर्च करुन फॅन्सने घेतली Ind vs Pak सामन्यांची तिकीटं; क्षणांत Sold Out


 


जितेश आपल्या सोबत असल्यामुळं रिंकूनं सुटकेचा नि:श्वास सोडला. यामागचं कारणंही त्याच्याच बोलण्यातून व्यक्त झालं. 'इंग्लिश में मेरे हाथ तंग हैं।', असं म्हणत तुला चांगली इंग्रजी येते म्हणताना हॉटेलमधून कुठे बाहेर गेलोच तर तुला सोबतच नेईन असं रिंकू मोठ्या अपेक्षेनं आणि मजेशीरपणे म्हटलं आणि जितेशनंही त्याला होकारातच उत्तर दिलं. 



कर्णधारानं काही सल्ला दिलाय का? असा प्रश्न विचारला असता थेट आयर्लंडच्या भूमीतूनच रिंकूनं उत्तर देत फार ताण न घेण्याचाच सल्ला सर्वांनी दिल्याचं सांगितलं. बरं, त्यावर हा पठ्ठ्या 'क्रिकेट का डर नहीं है, इंटरव्यू का डर है' असं म्हणून तिथंही इंग्रजीची भीती व्यक्त करून मोकळा झाला. तेव्हा आता ऑनफिल्ड प्रदर्शनानंतर रिंकूची मुलाखत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.