India vs Ireland 3rd T20 Weather Report: भारत विरूद्ध आयरलँड ( India vs Ireland ) यांच्यामध्ये सध्या टी-20 सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेत सिरीजवर कब्जा केला आहे. असातच बुधवारी याचा तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. डबलिनच्या मालाहाइड क्रिकेट क्लब ग्राउंडमध्ये रंगणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 


आज संध्याकाळी खेळवला जाणार नाही सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) आयरलँडविरूद्धची ( India vs Ireland ) सिरीज जिंकली आहे. बुधवारी संध्याकाळी या सिरीजचा तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 


Accuweather च्या रिपोर्टनुसार, डबलिन ( Dublin Weather Report ) मध्ये पावसाची शंका 80 टक्के असल्याची व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. तर रिपोर्टनुसार, 3 वाजल्यापासून या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.


पहिल्या सामन्यात देखील झाला होता पावसाचा खेळ


भारत विरूद्ध आयरलँड ( India vs Ireland ) यांच्यामध्ये सिरीजमधील पहिला सामनाही डबलिनच्या मालाहाइड क्रिकेट क्लब मैदानावर खेळला गेला. या सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने या सामन्यात विजय मिळवला होता. पावसाच्या व्यत्ययाने या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला होता.


कशी असेल तिसऱ्या टी-20 साठी आयरलँडची टीम


पॉल स्टर्लिंग ( कर्णधार ), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अॅडायर, रॉस अॅडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.


तिसऱ्या टी-10 सिरीजसाठी संभाव्य प्लेईंग 11


जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप. सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.