India vs Nepal, Asian Games 2023 : आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये महिला संघाने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर आता पुरूष संघाने देखील विजयाचा श्रीगणेशा केलाय. पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना नेपाळचा संघ 9 गडी गमावून 179 धावाच करू शकला. त्यामुळे आता टीम इंडियाने सूवर्णपदकाकडे एक झेप घेतली आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने दमदार शतक ठोकलं. तर रिंकू सिंह (Rinku Singh) याने उत्तम फिनिशिंग टच दिला. रिंकची आक्रमक खेळी पाहून सध्या त्याचं कौतूक होताना दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून प्रथम फंलादाजी करताना टीम इंडियाची कामगिरी दमदार झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने आक्रमक शतक ठोकलं त्याने 8 सिक्स अन् 7 खणखणीत सिक्स ठोकलेत. त्याने 49 चेंडूत 100 धावांची खेळी केली. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 25 धावांचं योगदान दिलं. तिलक वर्मा अन् जितेश शर्मा फेल गेल्यानंतर रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. त्यावेळी त्याने 2 चौकार अन् 4 गगनचुंबी षटकार खेचले. 


रिंकू सिंह याने अखेरच्या ओव्हरमध्ये 23 धावा कुटल्या आणि टीम इंडियाला देखील 23 धावांनी विजय मिळवला आहे. रिंकू सिंहने जर अखेरच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली नसती तर सामन्याचं चित्र वेगळं असलं असतं, अशी चर्चा आता होताना दिसत आहेय. रिंकू सिंह याने सिनियर टीममध्ये खेळताना आक्रमक फलंदाजीचा नमुना दाखवून दिला होता. त्यामुळे आता रिंकू सिंह याला टीम इंडियामध्ये जागा कधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय.


पाहा रिंकूची फलंदाजी



दरम्यान, फलंदाजीसोबतच टीम इंडियाची गोलंदाजीत देखील धार दिसून आली. अर्शदीप सिंह याने 2 गडी बाद केले. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी 3-3 विकेट घेतल्या. तर रवी किशोर याला एक विकेट मिळाली. शिवम दुबे अन् वॉशिंग्टन सुंदर यांना विकेट मिळाली नाही.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (W), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.


नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (C), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने.