IND vs NZ 1st ODI Match:  न्यूझीलंडचा संघ उद्यापासून (18 जानेवारी 2023) भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार असून दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये खेळली जाणारी वनडे मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण श्रीलंकेचा क्लीन स्वीप केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ही क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर आयसीसी एक मोठी घोषणा करणार आहे. 


ICC ची वनडे सीरिजवर नजर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात उद्यापासून म्हणजे 18 जानेवारीपासून हैदराबाद येथे होणार आहे. जर या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केले. तर आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन होण्याची संधी असेल. दरम्यान सध्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ 117 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया 110 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात टीम इंडियाने क्लीन स्वीप केले तर टीम इंडियाचे 114 गुण होतील आणि न्यूझीलंडचा संघ 111 गुणांवर घसरेल. परिणामी टीम इंडियाला वनडेमध्ये नंबर वन मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थिती भारत आणि न्यूझीलंड हा सामना जिंकायचा आहे.    


टीम इंडियाची वनडे वर्ल्डची तयारी सुरु


नुकताच भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळेल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय झाला. त्यानंतर उद्यापासून सुरु होणाऱ्या न्युझीलंडविरुद्धचा सामन्यासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्ध खेळवली जाणारी मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. टीम इंडियाने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटच्या वेळी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 


 वाचा: ...अन् विराटच्या 71 व्या शतकाची वाट पाहणारा चाहता अखेर बोहल्यावर चढला 


न्यूझीलंडचा भारत दौरा असा असणार 


तारीख सामन्याची वेळ ठिकाण


18 जानेवारी पहिली वनडे हैदराबाद दुपारी 1.30 वाजता


21 जानेवारी दुसरी वनडे रायपूर दुपारी 1.30 वाजता


24 जानेवारी तिसरी वनडे इंदूर दुपारी 1.30 वाजता


27 जानेवारी पहिला T20 दुपारी 1.30 वाजता रांची


29 जानेवारी दुसरी टी-20 दुपारी 1.30 वाजता लखनौ .


1 फेब्रुवारी 3रा T20 अहमदाबाद दुपारी 1.30 वाजता


टीम इंडिया संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज, उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ  


टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, एच शिपले.