Umran Malik Speed : उमरान मलिकची वनडेत डेब्यूत कमाल! पहिल्याच बॉलवर..., पाहा VIDEO
Umran Malik Speed : जम्मू एक्सप्रेसचा न्यूझीलंड विरुद्ध कारनामा, पहिल्याच बॉलवर कमाल, VIDEO पहाच
IND vs NZ ODI: आयपीएलमध्ये आपल्या सर्वात वेगवान गोलंदाजीने संपुर्ण क्रिकेट विश्वाच लक्ष वेधून घेणाऱ्या उमरान मलिकने (Umran Malik) आज न्यूझीलंडविरूद्ध (New Zealand) वनडे सामन्यात डेब्यू (Debut match) केला होता. या डेब्यू सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने दबदबा कायम ठेवला होता. उमरान मलिकने (Umran Malik 1st Over in ODI) पहिलीच ओव्हर इतकी वेगवान टाकली होती की, त्याची आता चर्चा होऊ लागली आहे. या ओव्हरमध्ये नेमकं त्याने कितीच्या स्पीडने बॉलिंग टाकली होती? हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले
किती वेगाने टाकली ओव्हर?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली उमरानला खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्याच्या 11व्या ओव्हरमध्ये उमरानला (Umran Malik 1st Over in ODI) वनडेत पहिल्यांदा बॉलिंग करण्याची संधी मिळाली. उमरानने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिला बॉल 145.9kph वेगाने टाकला, तर दुसरा बॉल 147.3kph वेगाने आणि याच ओव्हरचा तिसरा बॉल 145.6kph वेगाने टाकला होता. चौथा बॉल 147.3kph वेगाने टाकला, त्यानंतर पाचवा चेंडू 137.1kph वेगाने टाकलाय. तर उमरानने त्याच्या ODI कारकिर्दीतील पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू वेगाने टाकला. त्याने तो बॉल 149.6kph वेगाने टाकला होता.
'या' खेळाडूचा विकेट घेतला?
उमरानने (Umran Malik 1st Over in ODI) त्याच्या ODI कारकिर्दीतील पहिला चेंडू न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) टाकला होता. या ओव्हरमध्ये केवळ त्याने 4 रन्सच दिले होते. तर उमरान मलिकने (Umran Malik 1st Over in ODI) कॉनवेला बाद करून त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली होती. उमरानने कॉनवेला विकेटकिपरकडून कॅच आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
टी20 तही बॉलिंगची जादू
वनडे सामन्यापुर्वी उमरानला (Umran Malik) भारताकडून 3 टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली. पण त्याला खास अशी कामगिरी करता आली नाही. तसेच त्याने आयपीएलमध्येही बॉलिंगने कमाल करून दाखवली होती.
दरम्यान आता कुठे जाऊन उमरानला (Umran Malik 1st Over in ODI) टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीच लवकर तो सोन करेल अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्स व्यक्त करतायत.