IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टॉस गमावल्यानंतर भारतीय संघाने (Team India) फलंदाजी करत 306 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिलच्या अर्ध शतकांच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर शिखर धवनने 72 आणि शुभमन गिलने 50 धावा केल्या. मात्र भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या (ravindra jadeja) जागी या मालिकेत खेळणाऱ्या एका खेळाडूने धडाकेबाज खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविंद्र जडेजाच्या जागी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 16 चेंडूत 37 धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्ध जडेजाच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदरने आपली दमदार खेळी दाखवली आहे. फिनिशरची भूमिका बजावताना धडाकेबाज खेळी खेळत 37 धावा केल्या आहेत. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 231.25 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने  3 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र यापेक्षा सध्या वॉशिंग्टनने खेळलेल्या एका षटकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात 30 धावा कुटल्या आहेत. या संधीचा फायदा घेत वॉशिंग्टन सुंदरने 231.25 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या आहेत.


यानंतर सर्वांनाच युवराज सिंगच्या इंग्लंडविरुद्धच्या खेळीची आठवण झाली आहे. भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू (Indian Cricketers) युवराज सिंगनं (Yuvraj Singh) 2007 मध्ये टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 षटकार ठोकले होते.



दरम्यान, शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने 21व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभमन गिलने 64 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 124 धावांची भागीदारी केली. गिलला लॉकी फर्ग्युसनने 50 धावांवर बाद केले. शिखर धवन 72 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत 33व्या षटकात 15 धावा काढून बाद झाला