Suryakumar Yadav Recorded the Worst T20 Record : भारताचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटींगच्या स्टाईलने '360 डिग्री प्लेयर' अशी ओळख मिळवली आहे. सूर्या मैदानात आल्यावर एकदम सेट बॅट्समनप्रमाणे गोलंदाजांना पिसायला सुरूवात करतो. मात्र शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये भारताचा पराभवच झाला नाही तर तुफानी बॅटींग करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नावावर एका खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे. (Ind vs Nz 1st t20 Suryakumar Yadav recorded the worst T20 record latest Marathi Sport News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची एकदम खराब सुरूवात झाली होती. भारताचे सुरूवातीचे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या मैदानात होते. फिरकीपटूंना मदत मिळत होती संघाच्या तीन विकेट गेल्या होत्या. सूर्याने आपल्या स्टाईलने बॅटींग करायला सुरूवात केली होती. (Suryakumar Yadav recorded the worst T20 record)


न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने पॉवरप्लेच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या षटकामध्ये चेंडू आपल्या हातात घेतला. विश्वास बसणार नाही पण सँटनरने सूर्यकुमारला एकही धाव घेऊ दिली नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचा फक्त पराभवच नाहीतर सूर्याच्या नावावर एका खराब विक्रमाची नोंद झाली आहे. 


सूर्याकुमार यादवआधी भारताच्या इतरही काही फलंदाजांच्या नावावरही या खराब विक्रमाची नोंद आहे. T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स खेळणाऱ्या पाच भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक के एल राहुलने 5, शिखर धवन 2, रोहित शर्मा 1, शुभमन गिल 1 आणि आता या यादीमध्ये सूर्याचाही समावेश झाला आहे.


दरम्यान, सूर्यकुमार यादवने या सामन्यात 47 धावा करत एक इतिहास रचला आहे. सूर्याने टी- 20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.