कानपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (ind vs nz 1st test) यांच्यात कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्या येत आहे. या सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. टीम इंडियाने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. तसेच टीम इंडियाकडे 49 धावांची आघाडी होती. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांची गरज आहे. (ind vs nz 1st test day 4 new zealand need to 284 runs for win at green park kanpur)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात पदार्पणवीर श्रेयस अय्यरने 65 धावांची खेळी केली. तर रिद्धीमान साहाने नाबाद 61 धावा केल्या. अक्षर पटेल यानेही नॉट आऊट 28 रन्स केल्या. अश्विनने 32 धावांच योगदान दिलं. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टीम साऊथी आणि कायले जेमीन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अझाज पटेलने 1 विकेट घेतला.