मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सीरिजमधील दुसरा सामना हा वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना 3 ते 7 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र आता क्रिकेटप्रेमींना निराश करणारी बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता वानखेडे स्टेडियममधील नियम बदलले आहेत. मुंबईत होणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली नाही. 


3 डिसेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी असेल. ही परवानगी 50 टक्के क्षमतेनं वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


वानखेडे स्टेडियममध्ये 30,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता ही परवानगी मिळणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.