VIDEO: एका क्षणात उडाला स्टंप, जडेजाच्या `घातक चेंडू`ने निर्माण केली दहशत, फलंदाज राहिला स्तब्ध
IND vs NZ 2nd Test: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुणे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात घातक फिरकी गोलंदाजी करत थक्क केले.
IND vs NZ 2nd Test: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी सिरीज सुरु आहे. या सीरिजच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कमाल केली. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात घातक फिरकी गोलंदाजी करत सगळ्यांना थक्क केले. जडेजाला भक्कम आधार मिळाला तो रविचंद्रन अश्विनचा. दोघांच्या गोलंदाजीने कहर केला. एका वेळी दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धावसंख्या १९८/५ होती, पण नंतर संघ दुसऱ्या डावात 255 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडने 57 धावांत आपले शेवटच्या 5 विकेट गमावल्या. यासह भारताला हा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
जडेजाच्या 'घातक चेंडू'ने केली दहशत निर्माण
रवींद्र जडेजाने पुणे कसोटीत दमदार कामगिरी केली. त्याने टॉम ब्लंडेलला क्लीन बोल्ड केल्याने एकच जल्लोष करण्यात आला. दुसऱ्या डावातील 60 व्या षटकात रवींद्र जडेजाने टॉम ब्लंडेलचा स्टंप त्याच्या एका 'घातक चेंडू'ने नष्ट केला. त्याची ही गोलंदाजी बघून सगळेच थक्क झाले. त्याचा या क्लीन बोल्ड विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टॉम ब्लंडेल ८३ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला.
बघा व्हायरल व्हिडीओ
बघायला मिळाली फिरकीपटूंची ताकद
फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलने 83 चेंडूत 41 धावा केल्या आणि ग्लेन फिलिप्सनेही 82 चेंडूत 48 धावा केल्या. या डावातही फिरकीपटूंची ताकद पाहायला मिळाली आणि पहिल्या डावात 7 विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने यावेळीही 4 विकेट्स घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाने 3 आणि रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतले.
रवींद्र जडेजाचे रेकॉर्ड
रवींद्र जडेजाची जबरदस्त डावखुरा फिरकी गोलंदाकी अशी प्रतिभा आहे. याशिवाय, रवींद्र जडेजा हा 7व्या क्रमांकावरचा अतिशय स्फोटक फलंदाज आहे. रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना महत्त्वाच्या क्षणी विकेट घेतो. क्षेत्ररक्षणातही रवींद्र जडेजा झटपट धावबाद करण्यात आणि अवघड झेल घेण्यात पटाईत आहे.
भारताचा इतिहास रचला जाईल
हा सामना जिंकण्यासाठी भारताला चौथ्या डावात 359 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांत आटोपला. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 156 धावांवर आटोपला होता. आता भारतासमोर चौथ्या डावात लक्ष्य आहे जे आतापर्यंत या सामन्याच्या तिन्ही डावात गाठता आलेले नाही. कर्णधार टॉम लॅथमच्या 86 धावांच्या योगदानामुळे न्यूझीलंड संघाने चौथ्या डावात 255 धावा केल्या.