रांची | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी 20 सामना  (ind vs nz 2nd t 20i)  खेळला जात आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले आहे. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने शानदार सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी अर्धशतकी स्फोटक भागीदारी केली. या दरम्यान रोहित शर्माने अनोखा कारनामा आपल्या नावे केला आहे. (ind vs nz 2nd t 20i team india hitman rohit sharma completed 450 sixes in across all format) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 450 सिक्सचा टप्पा ओलांडला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहितने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर डीप स्केवअर लेगला सिक्स खेचला. यासह रोहितचे 450 सिक्स पूर्ण झाले.


सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप 3 बॅट्समन 


ख्रिस गेल - 553 सिक्स 
शाहिद आफ्रिदी -  476 सिक्स 
रोहित शर्मा - 452* सिक्स  


टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.


न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स,  टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर,  एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.