IND vs NZ 2nd T20: सुर्यकुमार यादव ठरला `विराट` विक्रमाधीश!कोहलीचा `हा` मोठा रेकॉर्ड मोडला
IND vs NZ 2nd T20: बापरे! हा काय ऐकत नाही, सुर्यकुमार यादवने मोडला कोहलीचा `विराट` विक्रम
IND vs NZ 2nd T20 : न्युझीलंड विरूद्धचा दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) 65 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या विजयात सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) आणि दिपक हुड्डाने मोलाची भूमिका बजावलीय. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार (man of the match) सुर्यकुमार यादवला मिळालाय. हा पुरस्कार मिळवून सुर्यकुमार यादवने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडलाय.त्यामुळे आता सर्वत्र सुर्यकुमार यादवचीच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान नेमका सुर्यकुमार यादव कोणता रेकॉर्ड केलाय हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : 'ही दुसरी व्हिडिओ गेम खेळी', सुर्याच्या शतकावर विराटचं भन्नाट ट्विट
सुर्यकुमारची आतिषबाजी
टी20 वर्ल्ड कपनंतरही सुर्यकुमार यादवची (Surykumar yadav) बॅट थांबलीच नाही, ती धावांसाठी तळपतच आहेत. याची प्रचिती न्युझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील आली. सुर्यकुमारने 49 बॉलमध्ये 111 धावांची नाबाद शतकी तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले आहेत. सुर्याच्या या तुफान खेळीच विराट कोहली (Virat Kohli) सह अनेक दिग्गज क्रिकेटपंटून कौतूक केले.
हे ही वाचा : डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या
कसा रंगला सामना
सुर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) 111 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 191 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे न्युझीलंडसमोर (IND vs NZ) 192 धावाचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असलेला न्युझीलंड संघ 126 धावांवरच आटोपला. त्यामुळे टीम इंडियाने (Team India) हा सामना 65 धावांनी जिंकला होता.
हे ही वाचा : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे टीम इंडियाच्या खेळाडूची पत्नी,PHOTO पाहून थक्क व्हाल
विराटचा 'हा' विक्रम मोडला
टीम इंडियाने दुसरा टी20 सामना जिंकताच सुर्यकुमार यादवला (Surykumar yadav) प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार (man of the match) देण्यात आला. हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्विकारताच त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा कोहलीचा विक्रम मोडला. विराटने आतापर्यंतच्या सहा वेळा हा पराक्रम केला आहे. तर एका कॅलेंडर वर्षात सूर्यकुमार यादवचा हा सातवा सामनावीर ठरला आहे.
...तर भीमपराक्रम
एका कॅलेंडर वर्षात सूर्यकुमारचा (Surykumar yadav) हा सातवा सामनावीर पुरस्कार आहे. तर या मालिकेत सूर्यकुमारला मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध आणखी एक टी-20 सामना खेळायचा आहे.आणि जर त्याने या सामन्यातही सामनावीराचा पुरस्कार जिंकला, तर तो विक्रमाची पातळी आणखी उंच करेल. कारण मग एका कॅलेंडर वर्षात यादवला आठ वेळा सामनावीर पुरस्कार मिळतील. दरम्यान सध्या त्याचा सातचा आकडा इतक्या उच्च स्थानी आहे की तो गाठणे किंवा ओलांडणे हे कोणत्याही फलंदाजासाठी मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी20 सामना कोण जिंकतो हे पाहावे लागणार आहे.