Ajaz Patel | मुंबईच्या पोरानं मुंबईत टीम इंडियाला लोळवलं, एजाज पटेलचा धमाका
एजाज पटेल (Ajaz Patel) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा(10 Wickets) करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मूळचा भारतीय आणि जन्माने मुंबईकर असलेल्या एजाज पटेलने (Ajaz Patel) एतिहासिक कामगिरी केली आहे. एजाजने दुसऱ्या कसोटी सामन्यातील टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 10 च्या 10 विकेट्स घेतल्या. एजाज कसोटीत एकाच डावात 10 विकेट्स घेणारा एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. (Ind vs nz 2nd test 2day new Zealand Ajaz Patel take 10 wickets an in innings after James Charles Laker and anil kumble at wankhede stadium mumbai)
भन्नाट योगायोग
एजाजने मोहम्मद सिराजला आऊट करत एका डावातील 10 विकेट्स पूर्ण केल्या. या 10 विकेटच्या निमित्ताने एक भन्नाट आणि अनोखा योगायोग जुळून आला. एजाजच्या बॉलिंगवर मोहम्मद सिराजच्या कॅच रचीन रवींद्रने घेतला. या कॅचसह एजाजने अनिल कुंबळेंच्या विक्रमाची बरोबरी केली. अनिल कुंबळेने 4 फेब्रुवारी 1999 ला दिल्लीत पाकिस्तान विरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या.
एजाजने एकूण 47.5 ओव्हरपैकी 12 ओव्हर्स या मेडन टाकल्या. या 47.5 ओव्हरमध्ये त्याने 119 धावा देत 10 विकेट्स घेतल्या.
कसोटीत एका डावात 10 विकेट्स घेणारे गोलंदाज
इंग्लंड- जिम लेकर- 10 विकेट्स, विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत- अनिल कुंबळे- 10 विकेट्स, विरुद्ध पाकिस्तान
न्यूझीलंड - एजाज पटेल- 10 विकेट्स, विरुद्ध भारत
टीम इंडियाच्या पहिल्या डावात 325 धावा
दरम्यान एजाज पटेलच्या फिरकीसमोर टीम इंडियाचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मयांक अग्रवालने सर्वाधिक 150 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान यानंतर पहिल्या डावात खेळायला आलेल्या न्यूझीलंडचा डाव गडगडला.न्यूझीलंडने चहापानापर्यंत 16.4 ओव्हरमध्ये 38 धावा करुन 6 विकेट्स गमावल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डॅरेल मिचेल, रॉस टेलर, हेनरी निकोलस, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचीन रवींद्र, कायले जेमीन्सन, टीम साऊथी, विल्यम सोमरविल आणि अझाज पटेल.