IND VS NZ 2nd Test :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर (Team India) 8 विकेट्सने विजय मिळवला तर सीरिजमध्ये 0-1 अशी आघाडी सुद्धा घेतली. 36 वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध सामना जिंकला. आता भारत - न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टेस्ट सामना हा पुण्यात होणार आहे. हा सामना फ्रीमध्ये प्रेक्षकांना कुठे पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टेस्ट सामना होणार असून तो पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहे. यासाठी रविवारी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून यात शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आलेली आहे. टीम इंडियाला पुण्यातील टेस्ट सामना काहीही करून जिंकावा लागेल. जर बंगळुरू प्रमाणे या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताच्या स्थानावर परिणाम होईल, आणि WTC फायनलमध्ये पोहोचण सुद्धा अवघड होण्याची शक्यता आहे.  तसेच 2012 नंतर पहिल्यांदाच टीम इंडिया भारतात खेळी गेलेली टेस्ट सीरिज गमावलं. 


हेही वाचा : कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच


 


कुठे आणि कधी पाहता येतील सामने : 


गुरुवार 24 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टेस्ट सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. या सामान्याचं लाईव्ह टेलिकास्ट Sports18 Network  वर दाखवण्यात येईल. तर डिजिटल प्लेटफॉर्म Jio Cinema वर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. प्रेक्षक हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकता. मात्र ही सुविधा डीडी फ्री डिश आणि अन्य डीटीटी (डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. पण डीडी स्पोर्ट्स चॅनल केबल टीव्ही किंवा DTH प्लेटफॉर्म जसं की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीवी आणि टाटा प्लेवर प्रसारित होईल यावर भारत - न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट दाखवला जाणार नाही.  


हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?


 


भारतीय संघ : 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.