नवी दिल्ली : वेलिंगटनमध्ये अपयश मिळाल्यानंतर भारतीय संघावर न्यूझीलंडविरूद्ध खेळण्याचा दबाव होता. क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाला पहिला धक्का तेव्हा मिळाला जेव्हा ईशांत शर्मा जखमी होऊन सामन्यातून बाहेर पडला. यावेळी देखील टॉस हरून भारतीय संघाला फलंदाजी करावी लागली. मात्र पृथ्वीने भारतीय संघाला दमदार सुरूवात केली असून अर्धशतक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या ओव्हरमध्ये चौका लगावून आपला विचार स्पष्ट केलं. मयंक थोडा वेळ घेताना दिसला मात्र त्याला ट्रेंट बोल्टने लवकरच तंबूत पाठवलं. सहाव्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा चौका लगावताना तो त्याच ओवरमध्ये एलबीडब्ल्यू होऊन आऊट झाला. मयंकने एकूण सात धाव केल्या. त्यावेळी टीम इंडियाचा स्कोर हा 30 धावां एवढा होता. 



 



पृथ्वी शॉला संधी मिळताच त्याने चौका लगावला. पुजारा आणि शॉने एकूण 12 ओव्हरमध्ये टीम इंडियाला 50 धावांचा स्कोर केला. तोपर्यंत पृथ्वी शॉ 35 धावांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी पुजाराने देखील मजबूत डिफेन्स केला. 


 



19 व्या ओव्हरमध्ये शॉने वैगनरला छक्का लगावून आपलं अर्ध शतक पूर्ण केलं. शॉला या करता 61 चेंडूंचा सामना करावा लागला. याच्या पुढच्या ओव्हरमध्ये शॉने जैमिसनच्या चेंडूंवर स्लिपवर कॅट चेऊन तो आऊट झाला. शॉने 54 धावा करून संघाला दमदार शतक मिळवून दिली.