मुंबई : भारत आणि न्यूझीलंड ( Ind vs NZ ) यांच्यात सुरु असलेल्या सीरीजमध्ये पावसाचा अनेक वेळा व्यत्यय आला आहे. T20I सीरीज आणि वनडे सीरीजमध्ये ही पावसामुळे अडथळा आला. रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा दुसरा वनडे सामना ही पावसामुळे रद्द झाला. आता तिसऱ्या वनडे सामन्यावर ही पावसाचं सावट आहे. सध्या भारतीय संघ या सीरीजमध्ये 1-0 ने मागे आहे. ( rain affect 3rd ODI of India vs new zealand)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan ) नेतृत्वात न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. 30 नोव्हेंबर रोजी सीरीजचा तीसरा आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. पण हा सामना जर पावसामुळे रद्द (Match Draw) झाला तर भारतीय संघ सीरीज 1-0 ने पराभूत होईल.


न्यूझीलंडच्या हवामान खात्याने बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी तापमान 10 डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे जर खेळ थांबला तर कमी ओव्हरची मॅच होऊ शकते. पण पाऊस जर थांबलाच नाही तर सामना रद्द होऊ शकतो.


तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस (Toss) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच डीएलएस नियमाची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. 27 नोव्हेंबरला 29-29 ओव्हरचा सामना होणार होता. पण नंतर जेव्हा पुन्हा पाऊस आला तेव्हा सामना रद्द करण्यात आला.


दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड संघाचं टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे तिसरा सामना रद्द झाला किंवा पराभव झाला तरी सीरीज 1-1 ने बरोबरीत सुटेल. पहिल्या वनडेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. केन विलियम्सनची ( Kane Williamson ) अर्धशतकीय खेळी आणि टॉम लेथमच्या शतकीय खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.


भारतीय संघाने टी20 सीरीज 1-0 ने जिंकली होती. 2 टी-20 सामने पावसामुळेच अनिर्णित ठरले होते. भारतीय संघ आता तिसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.