IND vs NZ 3rd T20: एकच सामना जिंकला, तरीही टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय कसा?
IND vs NZ 3rd T20: रोहित- विराट शिवाय हार्दिक पंड्याने `करून दाखवलं`, टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचला तरी कसा?
IND vs NZ 3rd T20 : टीम इंडिया आणि न्युझीलंड (India vs New Zealand) याच्यात खेळवला गेलेला तिसरा टी20 सामना पावसामुळे (टाय) बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे टीम इंडियाने (Team India) 1-0 ने मालिका जिंकली आहे. ही मालिका जिंकत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. मात्र या मालिकेतील दोन सामने पावसामुळे वाया गेले, तर एक सामना भारताने जिंकला. त्यामुळे एक सामना जिंकूनही टीम इंडियाने इतिहास कसा रचला, असा प्रश्न अनेक क्रिकेट फॅन्सला पडला आहे.
हे ही वाचा : पावसामुळे खेळ थांबला, भारत 75/4, DLS नियमानुसार काय निकाल लागणार?
कसा रंगला सामना?
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्युझीलंडचा (New Zealand) डाव 160 धावांवर आटोपला होता. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉन्वेने (Devon Conway) 59 आणि ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) 54 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे टीम इंडियासमोर (Team India) 161 धावांचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने 4 विकेट गमावून 75 धावा ठोकल्या होत्या. यानंतर सामन्यात पाऊस पडला आणि सामना थांबला होता.
हे ही वाचा : टीम इंडियासमोर इतक्या धावांचे आव्हान
DLS मेथडने लागला निकाल?
डकवर्थ (DLS) लुईस नियमानुसार टीम इंडियाचा (Team India) स्कोर न्यूझीलंडच्या (New Zealand) बरोबरीत होता. भारताला विजयासाठी 66 बॉलमध्ये 86 धावा हव्या होत्या, पण त्यापलीकडे हा सामना खेळवता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने जिंकली.
हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल
ऐतिहासिक विजय कसा?
न्युझीलंडविरूद्ध (New Zealand) 1-0 ने मालिका जिंकून टीम इंडियाने (Team India) मोठा विक्रम केला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच सलग दुसरी टी-20 मालिका जिंकली आहे. याआधी टीम इंडियाने 2020-21 च्या दौऱ्यावरही टी-20 मालिका जिंकली होती. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळले गेले आणि पाचही सामने टीम इंडियाने (Team India) जिंकले होते.
टी20 मालिकेनंतर आता टीम इंडिया न्युझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेत टीम इंडिया (Team India) कशी कामगिरी करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.