कोलकाता : टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने यामध्ये 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले. त्या व्यतिरिक्त इशान किशनने 29, श्रेयस अय्यरने 25, दीपक चाहरने नाबाद 21 तर व्यंकटेश अय्यरने 20 धावा केल्या. (IND vs NZ 3rd T20 team india set 185 target to new zealand at eden garden kolkata)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडकडन मिचेल सँटनरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट,  एडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन आणि इश सोढी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 



टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी , मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, लॉकी फर्गुयसन आणि ट्रेन्ट बोल्ट.