कोलकाता |  'रनमशीन' विराट कोहलीला (Virat Kohli) न्यूझीलंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी (IND VS NZ T20 Series 2021) विश्रांती देण्यात आली आहे. या विश्रांतीचा फायदा रोहित शर्माने घेतला आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (ind vs nz 3rd T20i team india hitman rohit sharma break virat kohli most 50 plus score world record at eden garden kolkata)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने यामध्ये 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले. रोहितच्या टी 20 कारकिर्दीतील हे 26 वं अर्धशतक ठरलं. 


या अर्धशतकासह रोहितने विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहित विराटला पछाडत टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 30 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा   क्रिकेटर ठरला आहे. विराटने एकूण 29 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 


रोहित-विराटमध्ये कडवी झुंज


रोहितने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 अर्धशतकं आणि 4 शतकं लगावली आहेत. तर विराटने 29 अर्धशतकं लगावली असून त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. रोहित आणि विराटनंतर टी 20 मध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा नंबर आहे.


टी 20 मध्ये 50+ धावा करणारे फलंदाज 


रोहित शर्मा - 30*


विराट कोहली - 29


बाबर आझम - 25


डेव्हिड वॉर्नर - 22


मार्टिन गुप्टील - 21


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, लॉकी फर्गुयसन आणि ट्रेन्ट बोल्ट.