कोलकाता |  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसऱ्या टी 20 सामन्याला अवघ्या काही मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड आधी बॉलिंग करणार आहे. टीम इंडियाने या 3 सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 आघाडीवर आहे. त्यामुळे संघात अपेक्षेप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. (IND vs NZ 3rd T20i team india win the toss and choose the batting at eden garden kolkata) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियात 2 बदल 


तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर केएल राहुल आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन या  दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर या दोघांच्या जागी इशान किशन आणि युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. या सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याला संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, लॉकी फर्गुयसन आणि ट्रेन्ट बोल्ट.