मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. न्युझीलंडविरूद्ध (New Zealand) त्याने शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्य़चकीत केले होते. या त्याच्या शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात भरपूर कौतूक होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध खेळाडूने सुर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केले आहे. सुर्यकुमार यादव बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) परवडणार नसल्याचे विधान त्याने केले आहे. या खेळाडूच्या विधानाची आता चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' सीनियर खेळाडू संघातून बाहेर 


कौतूक करणारा खेळाडू कोण?


न्युझीलंडविरूद्धच्या (New Zealand) दुसऱ्या टी20 सामन्यात सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  51 बॉलमध्ये 111 धावांची तुफानी शतकी खेळी केली होती. या त्याच्या खेळीचे सर्वंत्र कौतूक करण्यात आले होते.ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) देखील सुर्याच्या या खेळीच कौतूक केले आहे.


"द ग्रेड क्रिकेटर" पॉडकास्टवर बोलताना, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला की, सामना सुरू होता हे मला माहित नव्हते, पण मी नंतर स्कोअरकार्ड पाहिला आणि त्याचा फोटो फिंचला (अँरोन फिंच) पाठवला. हा स्कोरकार्ड पाहून तो म्हणाला की, 'हा माणूस काय करतोय? तो पूर्णपणे वेगळ्या ग्रहावर जाऊन फलंदाजी करतोय! इतर खेळाडूंची धावसंख्या पाहा आणि सुर्याने 50 बॉलमध्ये 111 धावा केल्या,असे तो म्हणाला. तसेच खेळपट्टी फलंदाजांसाठी तितकीशी सोपी नव्हती. पण सुर्यकुमारने ते सहजरित्या करून दाखवलं असल्याचेही तो म्हणालाय. 


सुर्याच्या आतिषबाजीवर काय म्हणाला? 


मॅक्सवेल (Glenn Maxwell) पुढे म्हणतो की, "मी दुसर्‍या दिवशी या सामन्याचा रिप्ले पाहिला, आणि हे खुप लाजिरवाण होत की तो इतर खेळाडूंपेक्षा खूप चांगला आहे. त्याला खेळताना पाहणे जवळजवळ कठीणच आहे. तो आमच्या संघात असलेल्या इतर खेळाडूंपेक्षाही खुप चांगला आहे, अशी स्तुती त्याने केली.


बिग बॅश लीगमध्ये खेळू शकेल का? 


सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळू शकेल का, असा प्रश्न मॅक्सवेलला (Glenn Maxwell) विचारण्यात आला होता.यावर मॅक्सवेलने खुपच भन्नाट उत्तर दिले. तो म्हणाला की, अशा अविश्वसनीय खेळाडूची किंमत कोणत्याही संघाला परवडणार नाही. "आम्ही सूर्यकुमारला बिग बॅश लीगमध्ये सर्व पैसे देऊनही तो परवडणार नाही. आम्हाला सर्वांना काढून टाकावे लागेल, पैसे वाचवावे लागतील आणि मग आशा आहे की तो परवडेल,असे मॅक्सवेल म्हणाला आहे.  


दरम्यान मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) केलेल्या कौतूकाची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.