India vs New Zealand: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारख्या सिनियर खेळाडूंच्या गैरउपस्थितीत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळण्यात येणार आहे. शुक्रवारी म्हणजेच उद्यापासून वेलिंग्टनच्या स्काई स्टेडियममध्ये पहिला सामना खेळण्यात येणार आहे. मात्र यावेळी कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियामध्ये जवळपास अधिकतक खेळाडूंची जागा पक्की आहे. नेहमी रोहित शर्मा आणि केएल राहुल ओपनिंग जोडी म्हणून मैदानात उतरतात. मात्र उद्याच्या सामन्यात ओपनिंगला कोण उतरणार हा हार्दिकसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे.


मुख्य म्हणजे ओपनिंगच्या जागेसाठी टीममध्ये 4 दावेदार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


ओपनिंगसाठी 4 ऑप्शन


ओपनर म्हणून रोहित आणि राहुलची कमतरता भरून काढण्यासाठी टीममध्ये 4 पर्याय आहेत. यामध्ये डावखुरा विकेटकीपर फलंदाज इशान किशन हा मुख्य दावेदार मानला जातोय. त्याशिवाय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर नुकतंच टी-20 मध्ये पहिलं शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला देखील डेब्यूची संधी दिली जाऊ शकते. तर दीपक हुड्डाही ओपनिंगसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो.


कशी असू शकते प्लेईंग 11


दीपक हुड्डा, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज


टीम इंडियाची संपूर्ण स्क्वॉड


हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक