क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ८९/६ एवढा आहे. न्यूझीलंडचा २३५ रनवर ऑलआऊट केल्यामुळे भारताला ७ रनची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी आणखी झाली असती, पण पुन्हा एकदा टेलएंडर्सचं भूत भारताच्या मानगुटीवर बसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवशी भारतीय टीम २४२ रनवर ऑलआऊट झाल्यानंतर न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता ६३ रन केले होते. दुसऱ्या दिवसाच्या लंचनंतर न्यूझीलंडचा स्कोअर १५३/७ एवढा झाला होता. तरीही भारतीय बॉलरना न्यूझीलंडला २०० रनच्या आत ऑलआऊट करता आलं नाही.


न्यूझीलंडच्या शेवटच्या ३ विकेटनी ८२ रन केले. काईल जेमिसनने पुन्हा एकदा शानदार ४९ रनची खेळी केली. जेमिसनने नील वॅगनरसोबत नवव्या विकेटसाठी ५१ रनची पार्टनरशीप केली.


मागच्या २ वर्षात भारतीय टीमला खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या बॅट्समनना आऊट करण्यात नाकी नऊ आले आहेत. २०१८ सालचा इंग्लंड दौरा यातलं सर्वोत्तम उदाहरण आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या काही टेस्ट मॅच भारताला तळाच्या विकेट घेता न आल्यामुळे गमवाव्या लागल्या होत्या. 


इंग्लंड दौऱ्यातही टेलएंडर्सचा त्रास