मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड आज सामना होणार आहे. 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. याचं कारण हा सामना न जिंकल्यास टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना किती वेळा झाला? हेड टू हेडची आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सोबत 10 विकेट्सनी सामना पराभूत झाल्यानंतर आज टीम इंडियाचा दुसरा टी 20 वर्ल्ड कप सामना होणार आहे. आजचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना भारतीय संघासाठी आर या पारची लढाई असणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडलाही पहिला सामना पाकिस्तानकडून गमवावा लागला होता. त्यामुळे आजच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे लक्ष विजयाकडे असणार आहे. 


 भारत विरुद्ध न्यूझीलंड आजचा सामना 17 वा असणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ 16 वेळा आमने सामने आले आहेत. याआधी झालेल्या 16 सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचं पारडं जास्त जड आहे. याचं कारण म्हणजे न्यूझीलंड संघ 8 सामने जिंकला आहे. तर टीम इंडियाला केवळ 6 सामने जिंकण्यात यश मिळालं आहे. तर 2 सामने टाय झाले आहेत.


 2003 पासून भारताला आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. यादरम्यान दोन्ही संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे मिश्रण करून ५ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. प्रत्येक वेळी टीम इंडियाला दोन ते चार वेळा पराभव पत्करावा लागला.आता न्यूझीलंड विरुद्धचा सामना आता टीम इंडियाला जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाला इतिहास बदलायचा आहे. त्यामुळे विराट कोहली काय स्ट्रॅटजी तयार करतो याकडे सर्वांचं लक्षं असणार आहे.