मुंबई : भारतीय फलंदाजांच्या फळीतील मजबूत स्तंभ असलेले विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा आज दुसऱ्यांदा फ्ल़ॉप ठरले आहेत. यामुळे न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 183 रन केले आहेत. तर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने 4 विकेट गमवत 144 रन केले आहेत. अजूनही भारतावर 39 रनची लीड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजिक्य रहाणे 67 बॉलमध्ये नाबाद 25 तर हनुमा विहारी 70 बॉलमध्ये नाबाद 11 रनवर खेळत आहे. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 348 रन केले आहेत. ट्रेंट बोल्टने भारतीय खेळाडूंना चांगलेच झटके दिले.


बोल्टने 27 रन देत 3 विकेट घेतले आहेत. ज्यामध्ये पुजारा आणि कोहली यांचा समावेश आहे. पुजाराने 81 बॉलमध्ये 11 रन केले. पुजारानंतर कोहली देखील काही खास कामगिरी नाही करु शकला. त्याने 43 बॉलमध्ये 19 रन केले. बोल्टच्या शॉर्ट पिच बॉलवर तो आऊट झाला. 


मयंक अग्रवालने अर्धशतक ठोकलं. त्याने 99 बॉलमध्ये 58 रन केले. पृथ्वी शॉने 30 बॉलमध्ये 14 रन केले. अग्रवालने आज सकारात्मक बॅटींग केली. रहाणे आणि विहारी खेळत आहेत. दोघांनी 19.4 ओव्हरमध्ये 31 रनची पार्टनरशिप केली. न्यूझीलंडच्या बॉलर्सने भारतीय फलंदाजांना मैदानावर टिकण्याची संधीच दिली नाही.


भारताकडून ईशांत शर्माने 68 रन देत 5 विकेट घेतले. रविचंद्रन अश्विनने 899 रन देत 3 विकेट घेतले.