रिषभ पंतला नवा पर्याय! IPL मधला धाकड खेळाडू टीम इंडियात
रिषभ पंतला टफ फाईट देणार! IPL मधला धाकड खेळाडू टीम इंडियात... पाहा कोण आहे हा खेळाडू?
मुंबई: आयपीएल आणि क्लास A सामन्यात तुफान फलंदाजीने संघाला विजयापर्यंत पोहोचवणाऱ्या धडाकेबाज खेळाडूला टीम इंडियात समाविष्ट करण्यात आलं आहे. या धडाकेबाज फलंदाजामुळे आता रिषभ पंतला टफ फाईट असणार आहे. हा खेळाडू रिषभ पंतला पर्याय असणार आहे.
25 तारखेपासून नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना सुरू होणार आहे. विकेटकीपर रिषभ पंतला पर्याय मिळाला आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळणाऱ्या के एस भरतला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे.
टी 20 वर्ल्ड कप आणि टी 20 सीरिजमध्ये रिषभ पंतने म्हणावी तेवढी चांगली कामगिरी केली नाही. किवी संघाविरुद्ध कसोटी मालिकेत त्याला आराम देण्यात आला आहे. भारतीय संघात आरसीबीच्या वतीने खेळणाऱ्या के. एस. भरता यांना संधी देण्यात आली आहे.
केएल भरत एक अतिशय जिद्दी फलंदाज आहे. लांब षटकार ठोकण्यासाठी भरत पटाईत आहे. त्यामुळे आता हा नवा गडी रिषभ पंतसाठी भारी पडू शकतो. के एस भरत घरच्या मैदानात 78 सामने खेळून 4283 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2021 मध्ये 8 सामने खेळून त्याने 191 धावा केल्या आहेत. आता कर्णधार अजिंक्य राहाणे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.
टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.
दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.