कानपूर: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया कानपूर इथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. या सामन्यात टीम इंडियाने 4 गडी गमावून 258 धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवशीच मयंक अग्रवालने 28 बॉलमध्ये 13 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने 39 बॉलमध्ये 52 धावा केल्या आहेत. 88 बॉलमध्ये 26 धावा केल्या आहेत. 63 बॉलमध्ये 35 धावा केल्या आहेत. 


श्रेयस अय्यरने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 136 बॉलमध्ये 75 धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजाने 100 बॉलमध्ये 50 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा पहिल्या दिवस अखेर नाबाद राहिले आहेत. 


टीम इंडियाने पहिल्या दिवस अखेरपर्यंत 4 गडी गमावून 258 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघातून काइल जेमिनसनने 2 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. 


 टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 
शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव