क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत संकटात सापडला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ८९/६ एवढा झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताला ७ रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने ६३/० अशी केली होती. यानंतर भारतीय बॉलरनी अचूक बॉलिंग करत न्यूझीलंडचा डाव २३५ रनवर संपवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर न्यूझीलंडची अवस्था १५३/७ अशी होती, तरीही भारतीय बॉलरना न्यूझीलंडला २०० रनच्या आत ऑलआऊट करता आलं नाही. किवींच्या शेवटच्या ३ विकेटने ८२ रन जोडले.


काईल जेमिसनने पुन्हा एकदा शानदार ४९ रनची खेळी केली. जेमिसनने नील वॅगनरसोबत नवव्या विकेटसाठी ५१ रनची पार्टनरशीप केली. जेमिसन आणि वॅनगर हे भारताला आणखी गोत्यात आणणार असं वाटत असतानाच रवींद्र जडेजाने वॅगनरचा अफलातून असा कॅच पकडला. मोहम्मद शमीने टाकलेल्या शॉट बॉलवर वॅगनरने पूल मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जडेजाने उडी मारून एका हातात कॅच पकडला.



भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही जडेजाने पकडलेल्या या कॅचचं कौतुक केलं आहे. जडेजाचा जबरदस्त कॅच, असं रवी शास्त्री त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.



फिल्डिंगसोबतच जडेजाने बॉलिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. जडेजाने १० ओव्हरमध्ये २२ रन देऊन न्यूझीलंडच्या २ विकेट घेतल्या. रॉस टेलर आणि कॉलिन डिग्रॅण्डहोम या दोघांना जडेजाने माघारी धाडलं. वॅनगरच्याआधी जडेजाने बीजे वॉटलिंगचा कॅचही पकडला होता. या मॅचमध्ये भारतीय टीमने अश्विनच्याऐवजी जडेजाला संधी दिली आहे.