IND vs NZ Rohit Sharma most Sixes in ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 1st ODI) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा रेकॉर्ड़  केला आहे. रोहित शर्माने सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड केला आहे. तसेच रोहितने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचाही (MS Dhoni) रेकॉर्ड मोडलाय. या रेकॉर्डमुळे तो टीम इंडियाचा नवीन सिक्सर किंग बनला आहे. नेमका त्याने कोणता रेकॉर्ड केलाय? हे जाणून घेऊयात. (ind vs nz rohit sharma breaks ms dhoni record hitting most sixes in odi history in team india rajiv gandhi international stadium) 


हे ही वाचा : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर इतक्या धावांचे आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात  रोहित शर्माने सिक्स ठोकून मोठा विक्रम केला आहे. 


रेकॉर्ड काय? 


न्यूझीलंडकडून तिसरी ओव्हर टाकण्यास हेन्री शिपले आला होता. या बॉलरच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने (rohit sharma) कव्हर्सवर षटकार ठोकत इतिहास रचला. हा षटकार ठोकत रोहित शर्मा हा भारताच्या वनडे इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने आपल्या डावात दोन षटकार ठोकले होते. या षटकारांमुळे भारतातील त्याच्या षटकारांची संख्या 125 झाली आहे.


 


हे ही वाचा : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे


 


धोनीचा रेकॉर्ड तोडला 


रोहित शर्माने (rohit sharma) न्यूझीलंड विरूद्ध दोन षटकार ठोकताच त्याने वनडे इतिहासात 125 षटकार पु्र्ण केले होते. अशाप्रकारे रोहित शर्माने एमएस धोनीचा रेकॉर्ड मोडला. तर भारताच्या वनडे इतिहासात एमएस धोनीने 123 षटकार ठोकले आहेत. या यादीत तिसरे स्थान महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे आहे, ज्याने 71 षटकार ठोकले आहेत.


सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज


  • रोहित शर्मा- 125

  • एमएस धोनी -123 

  • सचिन तेंडुलकर- 71 


शाहिद आफ्रीदी टॉपवर


पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी वनडे इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादित पहिल्या क्रमांकावर आहे.आफ्रिदीने 398 सामन्यात 351 षटकार ठोकले आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेलने 301 सामन्यात 331 षटकार मारले आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या 445 सामन्यांत 270 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 
सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा (rohit sharma) चौथ्या स्थानावर आहे. वनडेत रोहित शर्माने 239 सामन्यात 265 षटकार ठोकले आहेत. 


दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माला (rohit sharma)मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा 38 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. ब्लेर टिकनरने त्याला मिशेलकरवी झेलबाद केले होते.