जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजमधील पहिला सामना टीम इंडियाने आपल्या नावे केला. 5 विकेट्सने सामना जिंकून टीम इंडियाने 1-0 आघाडी घेतला आहे. या सीरिजवर सावट आलं आहे. दुसरा सामना 19 नोव्हेंबर रोजी रांची इथे होणार आहे. या सामन्याआधीच तो होऊ नये स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्या विरुद्ध झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. याशिवाय प्रेक्षक संख्येवरील मर्यादाही पाळण्यात आली नव्हती. 


रांची इथे होणाऱ्या सामन्यात प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी होणारा सामना तात्पुरता स्थगित करावा असंही म्हटलं आहे. 


देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र स्टेडियम पूर्ण क्षमतेनं भरलेलं होतं. शिवाय कोरोनाचे नियम पाळला नसल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. 


किवी विरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यावर स्थगिती आणण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याशिवाय प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. 


भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरिजमधील दुसरा सामना शुक्रवारी रांची इथे होणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होईल तर 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात अडचणी येणार की सामना सुरळीत पार पडणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.