क्राइस्टचर्च : न्यूझीलंडच्या विरोधात टेस्ट सीरीजमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण चुकीचे शॉट खेळत आज विकेट ही गमवले. भारतीय टीमने १९४ रनवर ५ विकेट गमवले होते. मात्र ४८ रनमध्ये भारताची संपूर्ण टीम माघारी परतली. भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये २४२ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉने ६४ बॉलमध्ये ५४ रन केले. चेतेश्वर पुजाराने १४० बॉलमध्ये ५४ रन केले. हनुमा विहारीने ७० बॉलमध्ये ५५ रन केले. विहारी आऊट होताच टीम ही ढासळली. न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने ४५ रन देत ५ विकेट घेतले. जेमिसनने आपल्या टेस्ट करिअरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये एकाच इनिंगमध्ये ५ विकेट घेण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये चांगली सुरुवात केली. एकही विकेट न गमवता न्यूझीलंडने ६३ रन केले आहेत. टॉम लाथम २७ तर टॉम ब्लंडेल २९ रनवर खेळत आहे.


भारतीय फलंदाजांना पीचवर जास्त वेळ टिकणं कठीण होत आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात ही पराभवाचा धक्का टीम इंडियाला बसू शकतो. त्यामुळे विराटला नवी रणनीती आखावी लागणार आहे. 


ऋद्धिमान साहाच्या ऐवजी संघात स्थानी मिळालेल्या ऋषभ पंतला देखील काही चांगली कामगिरी करता आली नाही. तो १२ रनवर आऊट झाला. 


जेमिसनने पुजारा, पंत आणि उमेश यादवला माघारी पाठवलं. मोहम्मद शमीने १६ आणि जसप्रीत बुमराहने नाबाद 10 रन केले. कर्णधार विराट कोहली तीनवर आऊट झाला.


पहिल्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणारा मयंक अग्रवाल दुसऱ्या सामन्यात 7 रनवर आऊट झाला. तर अजिंक्य रहाणने ही ७ रनवर आऊट झाला. पृथ्वी शॉने काही चांगले शॉट्स खेळले. पण तो मोठा स्कोर करु शकला नाही. ट्रेंट बोल्टने ८९ रन देत २ विकेट घेतले.