जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये टीम इंडिया पहिला सामना 5 विकेट्सने जिंकली आहे. याच सोबत टीम इंडिया 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित आणि राहुल द्रविड पर्वाला विजयाने सुरुवात झाली आहे. विकेटकीपर रिषभ पंतने चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिषभ पंत 17 धावांवर नाबाद राहिला आहे. या 17 आकड्याशी रिषभचं खास नातं आहे. त्याच्या जर्सीचा क्रमांकही 17 आहे. रिषभ आणि या 17 आकड्याचं एक खास कनेक्शन आहे. हे काय कनेक्शन आहे आज जाणून घेऊया. 


ऋषभ पंतने दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 17 धावांची खेळी केली. पंतच्या या धावांमध्ये एक अद्भुत योगायोग पाहायला मिळाला. पंतने केवळ 17 बॉलचा सामना करत 17 धावा केल्या. एवढेच नाही तर पंतच्या जर्सीचा क्रमांकही 17 आहे आणि सामना झाला तेव्हा 17 तारीख होती.



ऋषभ पंतसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले गेले. वर्षाच्या सुरुवातीला पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासाठी त्याचा मोलाचा वाटा होता. पंतने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही आपला फॉर्म कायम ठेवला. 


आयपीएलमध्ये दिल्लीचं कर्णधारपद पंतच्या हाती आलं. तिथेही पंतने चांगली कामगिरी केली. दिल्ली संघाला प्ले ऑफ क्वालिफायरपर्यंत पंत घेऊन गेला. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमधील नुकत्याच झालेल्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाला विजयापर्यंत घेऊन जाण्यात त्याचा खारीचा पण मोलाचा वाटा आहे.