IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड  (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (IND vs NZ 3rd ODI) शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 386 रन्सचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची शतकी खेळी भारतासाठी फायदेशीर ठरली. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावत 385 रन्स ठोकले आहे. 


रोहित आणि गिलची शतकं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तब्बल 3 वर्षानंतर वनडेमध्ये शतक झळकावलं आहे. रोहितने 85 बॉल्समध्ये 101 रन्सची खेळी केली. तर रोहितसोबत ओपनिंग पार्टनर म्हणून आलेल्या शुभमन गिलनेही तुफान फलंदाजी केली. याशिवाय हार्दिक पंड्यानेही अर्धशतक झळकावलं. विराट कोहली 36 तर शार्दुल ठाकूरनेही 17 बॉल्समध्ये 25 रन्सची खेळी केली. 


रोहितची कॅप्टन इनिंग


रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.


ब्लेयर टिकनरने घेतले 3 विकेट्स


आजच्या सामन्यात किवींचे गोलंदाज काही प्रमाणात फेल गेल्याचं दिसून आलं. यासोबतच जेकॉब डफ्फीला देखील 3 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. तर मायकल ब्रेसवेलला एक विकेट मिळाली आहे. याशिवाय टीम इंडियाचे 2 खेळाडू रन आऊट झाले आहेत.


भारतीय क्रिकेट टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर


न्यूझीलंड क्रिकेट टीम


फिन एलन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, टॉम लेथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जेकॉब डफ्फी, ब्लेयर टिकनर, लॉकी फर्ग्यूसन, डग ब्रेसवेल