जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना होत आहे. रोहित शर्मा टी 20 सीरिजमध्ये कर्णधार आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियामध्ये व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमारलाही पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली आहे. यावेळी मात्र उमेश यादवला संधी देण्यात आली नाही. टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचं ध्येय असणार आहे असं व्यंकटेश म्हणाला. 


आजच्या सामन्यातून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. कर्णधार रोहितने मला संधी दिली. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असणार आहे अशी भावना व्यंकटेश अय्यनं व्यक्त केली. 


ही सीरिज टीम इंडियाला जिंकणं खूप गरजेचं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा वाईट पराभव झाला होता. न्यूझीलंड संघाला पराभूत करण्यासाठी रोहित शर्माला खास स्ट्रॅटजी वापरावी लागणार आहे. 


टीम इंडिया Playing XI


रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज



न्यूझीलंड टीम Playing XI टिम साउथी (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट