वेलिंग्टन : टी20 वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध (India Vs New Zealand) तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडूची बॉऊन्ड्री लाईनवर अप्रतिम फिल्डींग, VIDEO आला समोर  


टी20 पदार्पण


टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubnam Gill) आतापर्यंत भारताकडून वनडे आणि कसोटी सामने खेळले आहेत. मात्र अद्याप त्याने एकही टी20 सामना टीम इंडियाकडून (Team India) खेळला नाही आहे. त्यामुळे त्याचे टी20 पदार्पण झालेले नाही आहे. त्यात आता न्यूझीलंडविरूद्धच्या (New Zealand) पहिल्या टी20 सामन्यात त्याला टी20 पदार्पणाची संधी आहे. 


हे ही वाचा : IND vs NZ यांच्यातील पहिला T20 सामना मोफत पाहता येणार, कसे ते जाणून घ्या 


...तर शुभमन गिल 100 वा खेळाडू बनणार 


न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात जर शुभमन गिलला (Shubnam Gill) टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली तर तो भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा 100 वा खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत भारतीय संघातून 99 व्या खेळाडूंनी T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर शुभमन गिलने (Shubnam Gill) पदार्पण केल्यास तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 खेळणारा 100वा खेळाडू ठरेल. त्यामुळे शुभमन गिलला पहिल्या T20 सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली तर तो आपल्या नावावर एक वेगळा विक्रम करू शकतो. 


दरम्यान कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देतो,हे पहावे लागणार आहे. जर पंड्याने शुभमन गीलला (Shubnam Gill) संधी दिली तर, त्याच्यासाठी ते ऐतिहासिक पदार्पण ठरणार आहे. 
 
टीम इंडिया टी-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक


 न्यूझीलंड टी-20 संघ : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.