IND vs NZ: दस का दम | एजाज पटेलचा ऐतिहासिक कारनामा, एकाच डावात पटकावल्या 10 विकेट्स
दस का दम | एजाज पटेलचा ऐतिहासिक कारनामा, एकाच डावात पटकावल्या 10 विकेट्स, ठरला 3 गोलंदाज
मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीपर्यंत 10 विकेट्स गमवून 325 धावा केल्या आहेत. किवी संघाच्या बॉलरने ऐतिहासिक विक्रम केला आहे. टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात किवी संघाचा बॉलर एजाज पटेल याने हा विक्रम केला आहे.
एजाज पटेल याने टीम इंडिया विरुद्ध सामन्यात एकाच डावात 10 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला. हा विक्रम करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. ऐजाज पटेलनं 10 विकेट्स घेऊन विश्व विक्रम केला आहे. 10 बॅट्समनना त्याने तंबुत धाडलं आहे. अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध सामन्यात हा विक्रम केला होता. त्यांची बरोबरी करत एजाज पटेलनं हा विक्रम केला आहे.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना नेहमीच साथ देते. वानखेडे स्टेडियमवर हा विश्व विक्रम केला आहे. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विश्व विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे.
अशा घेतल्या विकेट्स
एजाजने सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 विकेट्स घेत एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत 10 वी विकेट पूर्ण केली. दरम्यान एजाजने दुसऱ्या दिवसाची झोकात सुरुवात केली. एझाजने रिद्धीमान साहा आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांना लागोपाठ बाद केलं.
इंग्लंड- जिम लेकर- 10 विकेट्स (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
भारत- अनिल कुंबळे- 10 विकेट्स (भारत विरुद्ध पाकिस्तान)
न्यूझीलंड - एजाज पटेल- 10 विकेट्स (न्यूझीलंड विरुद्ध भारत)