Yuvraj Singh On Virat Kohli : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli Record) याने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) महान रेकॉर्ड मोडीस काढला आहे. वानखेडे मैदानावर सचिनच्या समोरच विराटने सुवर्णक्षण आपल्या बॅटने लिहिला आहे. त्याच्या या कामगिरीनंतर आता क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 


काय म्हणाला Yuvraj Singh ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या या दिमाखदार कामगिरीबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.. आज तू महान विक्रमाला गवसणी घातली आहे. मला खात्री आहे की, तुझ्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असेल आणि वरून ढगांमधून आपल्या मुलाकडे पाहून आनंदाने हसत असतील. या पिढीतील आतापर्यंत सर्वात महान तू आहेस, असं म्हणत युवराज सिंहने विराट कोहलीचं कौतूक केलंय. 



Virat Kohli म्हणतो...


माझ्यासाठी हे एक मोठे स्वप्न आहे. हे स्वप्न मी पाहत असल्याचे मला वाटतंय.  संघातील प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे आणि ती प्रत्येकाला सांगितलेली आहे. त्यानुसार या सामन्यात मी खेळ केला. सामना जिंकण्यासाठी आम्ही 400 धावांचे टार्गेट ठेवलं होतं आणि त्याच्या जवळ आम्ही पोहोचलो आहोत. माझ्यासाठी संघाची कामगिरी अन् विजय महत्त्वाचा आहे. आज माझ्या या ऐतिहासिक शतक साजरं होत असताना सचिन तेंडूलकर, माझा हिरो... आणि माझी पत्नी आज मैदानात उपस्थित आहे. वानखेडेवर उपस्थिती प्रत्येक चाहत्याचा पाठिंबा हा माझ्यासाठी सर्वात मोलाचा आहे. एवढा मोठा पराक्रम केल्यावरही सचिनने केलेले अभिनंदन ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे, असं म्हणत विराटने सर्वांचे आभार मानले आहेत.