Asia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी
Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?
IND vs PAK: सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. मात्र याचदरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी टीम इंडिया (ind vs pak) पाकिस्तानमध्ये जाणार का? जर टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, मग ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी कुठे होणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मात्र याचदरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) 4 फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये बैठक होणार आहे. यामध्ये आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणावर चर्चा होणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केल. आशिया चषक सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या गटात गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश असणार आहे.
वाचा: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?
तर दुसरीकडे आशिया कप 2023 चे पाकिस्तान अधिकृतपणे यजमानपद भूषवत आहे. मात्र आशिया चषक (Asia Cup 2023) पाकिस्तानात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल BCCI चे सचिव, जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते की, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. जय शाह हे देखील ACC चे अध्यक्ष असल्याने त्यांच्या घोषणेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pcb) चिंता वाढली आहे.
या घोषणेनंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बीसीसीआयला धमकीही दिली. पीसीबीचे नवे अध्यक्ष नजम सेठी यांनी 23 जानेवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, एसीसी बोर्डाची बैठक 4 फेब्रुवारीला बहरीनमध्ये होणार आहे. यामध्ये आशिया कपवर चर्चा होईल. यावर तोडगा न निघाल्यास मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.
तसेच पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा पुढे म्हणाले की, जर टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आमचा संघ वनडे वर्ल्डकपसाठी भारतात पाठवणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच आशिया चषक दुसऱ्या ठिकाणी हलवल्यास आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकू असे भाष्य त्यांनी केले. मात्र, यानंतर रमीझ जास्त काळ पीसीबीच्या अध्यक्षपदावर राहू शकले नाहीत. त्यांच्या जागी पाकिस्तान सरकारने नजम सेठी यांना अध्यक्ष केले. त्यानंतर आता भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) हा सामना कुठे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.