IND vs PAK: आशिया कप 2022 मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. पुन्हा एकदा चाहते या सामन्याचा आंनद घेत आहेत. असं असलं तरी रोहित शर्माच्या या निर्णय़ामुळे लोकांनी त्याच्यावर टीका केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टॉस जिंकत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने या सामन्यात 3 मोठे बदल केले आहेत, सर्वात उल्लेखनीय म्हणजे दीपक हुडाचा दिनेश कार्तिकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात खेळताना दिसणार नाही. मागील सामन्यात त्याला ऋषभ पंतच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवण्यात आले होते. पण आता रवींद्र जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये डावखुरा फलंदाज म्हणून पसंती देण्यात आली आहे. अशा स्थितीत दिनेश कार्तिकला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मात्र, संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय कार्तिकच्या चाहत्यांना अजिबात मान्य नाही. दिनेशला केवळ बळीचा बकरा म्हणून ठेवण्यात आल्याचे चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी अनुभवी फलंदाजाला अशाप्रकारे बाहेर करणे ही चूक असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या सगळ्यामध्ये रोहित शर्माला प्रचंड ट्रोल केले जात आहे.