शेपूट वाकडं ते वाकडंच! रडत-खडत फायनलमध्ये गाठल्यावरही शोएब अख्तर बरळला
फायनलमध्ये गेल्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे.
Ind vs Pak Final : पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये पराभव करत फायनल गाठली आहे. आता भारत आणि इंग्लंडमध्ये उद्या सेमी फायनलचा सामना होणार असून यांच्यातील विजयी संघ पाकिस्तानसोबत दोन हात करणार आहे. नशिबाच्या जोरावर सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्ध सांघिक कामगिरी करता फायनल गाठली आहे. याचाच धागा पकडत पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे.
टीम इंडिया आता मेलबर्नमध्ये तुमची वाट पाहत आहे. आमच्या तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही इंग्लंडला फेटा बांधून पराभूत करा. याआधी आम्ही 1992 मध्ये मेलबर्नमध्ये आम्ही इंग्लंडला हरवलं होते आणि आता ते 2022 आहे. मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम सामना व्हावा, अशी माझी नाहीतर जगाची इच्छा असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे. यावेळी बोलतना शोएबने पाकिस्तान संघाने न्यूझीलंविरूद्ध केलेल्या प्रदर्शनाचं कौतुक केलं आहे.
पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्येही जाणार नाही असं वाटत होतं. झिम्बाब्वेकडून हरल्यावर नेदरलँड्स दक्षिण आफ्रिकेचा पराभव करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, मात्र पाकिस्तानच्या पाठिराख्यांच्या आशिर्वादामुळे संघाला हे यश मिळालं असून तुमच्या सर्वांचे धन्यवाद, असंही शोएब अख्तरने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, नेदरलँडने अनपेक्षितपणे मिळवलेल्या विजयाच्या जोरावर पाकिस्तान पुन्हा स्पर्धेत आली आहे. नाहीतर पाकिस्तानचा कधीच पत्ता गुल झाला होता. आता भारत आणि इंग्लंड सामन्यामध्ये कोण विजय मिळवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.