Asia Cup 2023 News: रविवारी एशिया कपच्या ( Asia cup 2023 ) स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात सामना रंगणार आहे. कोलंबोच्या मैदानावर हा हायव्होल्टेज सामना रंगणार असून चाहते देखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत. 2 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला होता. तर रविवारच्या सामन्यासाठी खास रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी विजय गरजेचा असून टीम इंडियाची ( Team India ) प्लेईंग 11 कशी असणार आहे यावर सर्वांचं लक्ष असेल. 


कशी असेल पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची ओपनिंग जोडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हे पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यासाठी ओपनर असणार आहे. हे दोन्ही फलंदाज पहिल्या 10 ओव्हर्समध्ये उत्तम फलंदाजी करतील. 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या ओपनिंर जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा (11) आणि शुभमन गिल (10) स्वस्तात माघारी परतले होते. मात्र आता सुपर 4 च्या सामन्यामध्ये पाकिस्तानला रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


मिडल ऑर्डरवर मोठी जबाबदारी


पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 च्या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli ) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार हे निश्चित आहे. त्यानंतर श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात येईल. या सामन्यात रोहित शर्मा केएल राहुलला टीममध्ये घेणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दरम्यान पाकिस्तानविरूद्ध खेळलेला इशान किशनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये पाचव्या क्रमांकावर उतरवण्याची दाट शक्यता आहे. 


ऑलराऊंडरमध्ये कोणाची लागणार वर्णी?


यानंतर ऑलराऊंडर म्हणून उपकर्णधार हार्दिक पंड्या 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर 7 व्या क्रमांकावर रविंद्र जडेजाला संधी देण्यात येईल. 


गोलंदाजी डिपार्टमेंट कसं असेल?


पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात स्पिनर कुलदीप यादवला संधी मिळणार आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांना स्थान मिळणं पक्क आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी उपस्थित नसलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. 


पाकिस्तानविरूद्ध कशी असेल संभाव्य Playing XI


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.