Ind vs Pak, World Cup 2023 : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) सर्वात रोमांचक अशा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला लोळवलं आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवात कठीण गेल्यानंतर टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) बॉलर्सने पाकिस्तानच्या बॅटर्सवर प्रचंड प्रेशर दिसून आलं. 155 वर 2 अशी परिस्थिती असलेला पाकिस्तानचा संघ 191 धावांवर ऑलआऊट झाला आहे.


नेमकं काय काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातील महत्त्वाचा असा टॉस भारताच्या पदरी पडला. पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. पाकिस्तानला मोहम्मद सिराजकडून पहिला हादरा बसला. अब्दुल्लाह शफिक सिराजच्या बॉलवर तंबूत परतला. इमाम उल हक याने दमदार फंलदाजीचे प्रदर्शन केलं. मात्र, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर इमाम बाद झाला. भारताला दुसरं यश मिळालं. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जमली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली अन् पाकिस्तानचा जम बसवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा संघ 155 धावांवर असताना पाकिस्तानच्या 2 विकेट होत्या. मात्र, सिराजने बाबरची विकेट काढली अन् पाकिस्तानच्या हुकमी एक्का बाद झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीनी प्रेशर आणलं. कुलदीप यादवचा मारा दुसऱ्या बाजूने चालू झाला. कुलदीपने शकील याला सहा धावांवर बाद केलं. पाकिस्तानला चौथा धक्का बसला. त्यानंतर कुलदीपने इफ्तिखार अहमदला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर पिच्चरमध्ये आला बुम बुम बुमराह...


बुमराहने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 ओव्हर केल्या होत्या. त्यानंतर रोहितने त्याला पुन्हा ओव्हर सोपवली. बुमराहने रिझवानला घरचा रस्ता दाखवला. मोहम्मद रिजवान 49 धावांवर बाद झाला. बुमराहच्या पुढच्या ओव्हरमध्ये शादाब खान अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानचा संघ आता रडकुंडीला आला होता. एकामागून एक विकेट्स गेल्यानंतर हसन अलीने पांड्याला फटकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जड्डूने फिरकी घेतली अन् हसन अलीला तुंबत पाठवलं. अखेर पाकिस्तानचा संघ 191 धावांवर गारद झालाय.



टीम इंडिया |  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर


पाकिस्तानचा संघ | बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.