IND vs PAK: टी20 वर्ल्डकप 2022 चा पहिलाच सामना रोमहर्षक ठरला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना ऐतिहासिक ठरला. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील दोन्ही संघामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मी विराट कोहली बाजी मारण्यात यशस्वी ठरला. विराट कोहलीने 53 बॉलमध्ये 82 धावांची नाबाद खेळी करत पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. (shoaib akhtar tweet after ind vs pak t20 wc)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विजयानंतर आता अंपायरच्या एका निर्णयावरुन टीका सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक पाकिस्तानींनीही भारतावर बेईमानीचा आरोप केला असून त्यात माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) नावाचाही समावेशआहे.



पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती. या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूत फक्त 3 धावा आल्या, विराट चौथ्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. यावेळी फिरकीपटू नवाझने कमरेच्या वर बॉल टाकला. ज्यावर शॉट खेळत विराटने सिक्स मारला. पण तो नो बॉल देण्यात आला. लेग अंपायरने लगेच नो बॉलचा इशारा दिला. यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम अंपायरकडे धावला. बाबर 15 ते 20 सेकंद अंपायरशी वाद घालत राहिला. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या जागी जावे लागले आणि पंचांनी आपला निर्णय बदलला नाही.


भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानात पुन्हा एकदा रडीचा डाव सुरु झाला आहे. अंपायरचा निर्णय चुकीचा होता असे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर #Cheating आणि #NO_BALL देखील ट्रेंड होत आहे. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विराट कोहलीचा फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये त्या निर्णयाबद्दल पंचांची खिल्ली उडवली आहे.


मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील ऐतिहासिक सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली, भारताने केवळ 31 धावांच्या धावसंख्येवर आपले 4 फलंदाज गमावले. पण त्यानंतर हार्दिक पांड्या (40) आणि विराट कोहली (82*) यांनी झुंज देत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 364 दिवसांनंतर गेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला पूर्ण केला आहे.